Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Sunday, June 3, 2007

असतात दोन लहान मुलं...

असतात दोन लहान मुलं चालायला शिकत

कधी धडपडत, कधी थोडं खरचटत

शरीयतच लागलेली असते त्यांची उभं रहाण्याची

खिडकीपासून दारापर्यंत धावत जाण्याची

अचानक एकाला सापडतात पडद्यामागे कुबड्या

कुबडीच्या जोरावर तो मारू पहातो उड्या

दुसरा त्याला पाहून थोडा हळहळतो

चालतो... पुन्हा पडतो

कुबड्या पाहून त्याची गम्मत असतो गालात हसत

कारण, खिडकीपासून दारापर्यंत पोहचतो तो आता सहज

अनेक वर्षांनी...

कुबड्या असतो तसाच अजून, कोपर्‍यात बसलेला

कुबड्याही असतात त्याच्या तिथेच, भिंतीला टेकलेल्या

दुसरा मात्र पळत असतो, धावत असतो सारखा

जगच जिंकायचे असते त्याला, नाही विचार दुसरा

मागत असतो देवाकडे तो पंखांमधले बळ

शिकलेलाच नसतो संकटातूनी काढायला कधी पळ

कुबड्या उठतो, पाय लडखळतात, मस्तकात जाते कळ

नकळत त्याचे हात जातात, बरोबर कुबडी जवळ

वाटतं त्याला आपणही पळावं, म्हणावं गाणं नाचत

पण घड्याळ फिरवलं मागे तरी, वेळ नाही ना फिरत !

हळूच डोळे पुसत, एकच तो ठरवतो

मुलाला स्वतःच्या, कुबड्यांऐवजी पंखांची स्वप्ने तो देतो

मुलाला, स्वतःच्या कुबड्यांऐवजी पंखांची स्वप्ने तो देतो

------------- आरक्षण ---------------